

Police and dog squad investigate the scene of a failed armed robbery in Solapur where robbers fled without loot.
Sakal
सोलापूर: जुळे सोलापुरातील गणेश नगर भागातील बस थांब्याजवळ समर्थ ज्वेलर्स दुकान आहे. शनिवारी (ता. १) सायंकाळी सात वाजून ४७ मिनिटांनी दोघेजण ज्वेलर्स दुकानात शिरले. एकाने बंदुकीचा तर दुसऱ्याने कोयत्याचा धाक दाखविला. त्यांनी सोबत आणलेल्या बॅगेत दुकानदाराला दागिने भरायला सांगितले. पण, अवघ्या ३० सेकंदात दोघेही दरोडेखोर एक ग्रॅमही दागिना न घेता आले तसे पसार झाले. या प्रकरणी दुकानदार दीपक दिगंबर वेदपाठक यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.