मंगळवेढ्यात कृषीपंपाच्या 275 कोटींची थकबाकी | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवेढ्यात कृषीपंपाच्या 275 कोटींची थकबाकी

सोलापुर : मंगळवेढ्यात कृषीपंपाच्या 275 कोटींची थकबाकी

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्‍यात कृषीपंपाच्या 275 कोटीच्या थकबाकीपोटी तालुक्‍यातील 2300 ट्रान्सफार्मरचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. अगोदरच हवामानातील बदलामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता खंडीत वीजपुरवठ्यामुळे आणखीच मेटाकुटीला आला.

महावितरणने गतवर्षीपासून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या कृषी संजीवनी योजनेमध्ये तालुक्‍यातील आठ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. जवळपास 24 हजार शेतकरी या योजनेपासून दूर आहेत. तालुक्‍यात नदीकाठ व कालवा लाभ क्षेत्र सोडले तर उर्वरित सर्व भाग हा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. परंतु, गेल्या काही दिवसापासून हवामानातील बदल बदलामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारावी लागत आहेत.

हेही वाचा: मुंबई | औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातीप्रकरणी 48 लाखाचा साठा जप्त

त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. इतर पिकावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचा शेतीतील उत्पन्नासाठी केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ जुळेनासा झाला आहे. त्यामुळे सध्या शेतकरी मेटाकुटीला आला. तर काही शेतकऱ्यांनी शेतीला पर्याय म्हणून दूर व्यवसायाला प्राधान्य दिले. परंतु खंडीत वीजपुरवठ्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सध्या आवाज उठवणेच्या दृष्टीने विधानसभेत जिल्ह्यातून आक्रमक चेहऱ्याची आवश्‍यकता आहे. जिल्हा नियोजन बैठकीमध्ये वीज प्रश्नावरून सर्व आमदार आक्रमक झाल्याचे दिसले. मात्र त्यापुढची कारवाई शून्य झाल्याचे या वीजतोडणी कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

"थकबाकीमुळे महावितरण कंपनीचे आर्थिक गणित कोलमडलत आहे. वसुलीसाठी वरिष्ठांकडून पाठपुरावा केला जात आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सुरु असलेल्या कृषी संजीवनी योजने भाग घेऊन आपला वीजपुरवठा सुरू करावा. योजनेच्या लाभासाठी महावितरणशी संपर्क साधावा."

- संजय शिंदे, सहाय्यक अभियंता, महावितरण

"शेतीपंपाचे बिलं मोघम दिली जात आहेत. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर सांगितले जाते की तुमच्याकडे एवढे शेतीपंपाची बिल आहे. न सांगता वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मुक्‍या जनावरांचे व पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहे."

- ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी

loading image
go to top