
सोलापूर : मागील नऊ महिन्यांपासून केंद्र सरकारकडून मानधन मिळाले नाही. तर राज्य सरकारकडून तीन महिन्यांचे मानधन मिळाले नाही. मानधन, कामाचा मोबदला याची सविस्तर माहिती म्हणजे मोबदला चिठ्ठी देण्याबाबत होणारी टाळाटाळ आणि कारवाईचा धाक दाखवत होणाऱ्या मानसिक, आर्थिक त्रासाच्या विरोधात शहर व जिल्ह्यातील तीन हजार २०० आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्धार केला आहे. थकीत मानधन दिल्याशिवाय सरकार-प्रशासनास कोणतेही सहकार्य करणार नाही, अशी भूमिका लाल बावटा आशा वर्कर्स, गट प्रवर्तक युनियनने घेतली आहे.