
कुर्डू : कुर्डूवाडी पंढरपूर रोडवर (लऊळ ता. माढा) येथे ढोरे वस्ती जवळ महामंडळाची बस व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये शिवाजी लक्ष्मण दळवी (वय २१ रा. उजनी मा) हा युवक जागीच ठार झाला. सूरज बाळासाहेब पाटील याचा (वय २४ रा. उजनी मा) उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला. रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला.