esakal | आषाढी वारी 2021 : नातेपुते येथे माउलींचे जल्लोषात स्वागत (Photo)
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी वारी 2021 : नातेपुते येथे माउलींचे जल्लोषात स्वागत!

आषाढी वारी 2021 : नातेपुते येथे माउलींचे जल्लोषात स्वागत! (Photo)

sakal_logo
By
सुनील राऊत

सोलापूर जिल्ह्यात एक वाजून वीस मिनिटाने व नातेपुते येथे दुपारी दीड वाजता शिवशाही बसने पालखीचे आगमन झाले.

नातेपुते (सोलापूर) : श्री संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा (Dnyaneshwar Maharaj Palkhi) आज सकाळी नऊ वाजता आळंदीहून शिवशाही बसमधून पंढरपूरला निघाला. सोलापूर जिल्ह्यात एक वाजून वीस मिनिटाने व नातेपुते येथे दुपारी दीड वाजता शिवशाही बसने पालखीचे आगमन झाले. नातेपुतेकर हजारो आबालवृद्ध सकाळी 11 पासून पालखी महामार्गावर दुतर्फा उभे होते. नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने खरेदी-विक्री संघासमोर भव्य स्वागत कक्ष उभा केलेला होता. या मंचावर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, माजी सरपंच अमरशील देशमुख, माजी उपसरपंच चंद्रकांत ठोंबरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी विक्रम मोरे, गाव कामगार तलाठी पभाकर उन्हाळे, हभप मनोहर महाराज भगत व गावातील वारकरी संप्रदायातील अनेक भजनी मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ashadhi Wari 2021: Sant Dnyaneshwar Maharaj's palanquin was welcomed at Natepute-ssd73)

पालखी महामार्गावर सुबक रांगोळी काढण्यात आली होती.

पालखी महामार्गावर सुबक रांगोळी काढण्यात आली होती.

हेही वाचा: शासकीय महापूजेवेळी "यांनाच' मंदिरात प्रवेश !

पालखी महामार्गावरील समता इंग्लिश स्कूलसमोर भव्य प्रमाणात सुबक रांगोळी काढण्यात आली होती. या ठिकाणी संस्थेच्या संचालिका सुमित्रादेवी राऊत, प्राचार्या वैशाली नायकवडी, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांनी फटाक्‍यांची आतषबाजी करत फुलांची उधळण केली. नातेपुते गावात प्रवेश केल्यापासून ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या व चौकाचौकात मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने माउलींच्या बसमध्ये पुष्पहार देण्यात आला, तो माउलींना घालण्यात आला.

नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने आज माऊलींच्या स्वागतासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले.

नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने आज माऊलींच्या स्वागतासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले.

हेही वाचा: आषाढी वारी : दशमीदिवशी वारकरी व भाविकांविना सुनेसुने झाले पंढरपूर!

नातेपुतेकरांनी भव्यदिव्य असे स्वागत करून माउलीवरील प्रेम आणि श्रद्धा पुन्हा दाखवून दिली.

नातेपुतेकरांनी भव्यदिव्य असे स्वागत करून माउलीवरील प्रेम आणि श्रद्धा पुन्हा दाखवून दिली.

माउलींच्या पुढे आणि मागे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त, आरोग्य विभागाच्या गाड्या आणि दोन शिवशाही बसमधून वारकरी आणि मानकरी होते. दरवर्षी माउलींचा सोहळा येताच गावात पावसाचे वातावरण असते. तसेच वातावरण आजही तयार झाले होते. माउलींचा सोहळा येतो त्यावेळी रिमझिम पाऊस सुरू होतो, हाही एक योगायोगच आहे. बसमधून माउली आलेली पाहताच अनेकांचे आनंदाश्रू वाहत होते. नातेपुतेकरांनी भव्यदिव्य असे स्वागत करून माउलीवरील प्रेम आणि श्रद्धा पुन्हा दाखवून दिलेली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे वंश परंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांचा सत्कार बाबाराजे देशमुख, मनोहर महाराज भगत यांनी केला.

या एका दृश्‍यावरूनच वारीच्या मार्गावरील गावांची माउलींप्रति काय श्रद्धा आहे हे दिसून येते.

या एका दृश्‍यावरूनच वारीच्या मार्गावरील गावांची माउलींप्रति काय श्रद्धा आहे हे दिसून येते.

आज माउली बसद्वारे पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत. नातेपुतेच नव्हे तर कोणत्याही वारीच्या मार्गावरील गावात एक मिनिट नव्हे एक सेकंदही गाडी थांबणार नाही, ही पूर्ण कल्पना असतानाही नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने आज माऊलींच्या स्वागतासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले. केवळ या एका दृश्‍यावरूनच वारीच्या मार्गावरील गावांची माउलींप्रति काय श्रद्धा आहे हे दिसून येते.

loading image