
सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एकूण सात विशेष गाड्या सोडलेल्या आहेत. यामध्ये १ ते १० जुलैपर्यंत पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा ३ एकेरी आषाढी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. तसेच उधना-मिरज विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होणार आहेत. मिरजेपर्यंत या एकेरी विशेष गाड्यांसह सात फेऱ्या होणार असून मध्य रेल्वे सध्या ८३ आषाढी विशेष गाड्या चालवत आहे. ६ जुलै रोजी आषाढीचा मुख्य सोहळा होणार आहे. मात्र, पंढरपूरकडे येणाऱ्या व परत जाणाऱ्या भाविकांची वर्दळ आषाढी एकादशी पूर्वी व नंतरही असते. यामुळे मध्य रेल्वेने १ ते १० जुलै दरम्यान विशेष गाड्या सोडल्या आहेत.