
पंढरपूर : यंदाच्या आषाढी वारीसाठी आलेल्या भोळ्याभाबड्या भाविक भक्तांनी विठुरायाच्या झोळीत भरभरून दान टाकले आहे. यंदा तब्बल १० कोटी ८४ लाख रुपये देणगी स्वरूपात विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे. मंदिर समितीला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक देगणी आहे.