

Preparations underway for Ashadhi Wari with modern German hangars planned at palkhi halt points.
sakal
सोलापूर: आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी मानाच्या १० पालख्या मुक्कामी असलेल्या ठिकाणी जर्मन हॅंगर (मंडप) उभारण्यात येणार आहेत. यंदा सोलापूरसह पुणे आणि सातारा या तीनही जिल्ह्यांतील मुक्कामस्थळी जर्मन हॅंगर उभारण्याची जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.