

Ashadhi Wari return journey devotees visit historic Shri Vitthal Temple at Madha after Pandharpur darshan Maharashtra
Sakal
माढा : आषाढी एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर द्वादशीच्या दिवशी परतीच्या प्रवासाला लागलेल्या शेकडो वारकरी भाविकांनी माढ्यातील कसबा पेठेतील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यातील विविध भागांकडे परतणाऱ्या भाविकांनी माढ्यात थांबून विठ्ठलाचे दर्शन घेत आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली.