Kurduwadi Barshi Traffic Jam : आषाढीवारीहून परतणाऱ्या वाहनांमुळे कुर्डूवाडी–बार्शी मार्ग ठप्प; रिधोरेच्या सीना पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पंढरपूरहून आषाढीवारी आटोपून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे परतणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे कुर्डूवाडी–बार्शी मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. रिधोरे येथील सीना नदी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने एसटी बससह हजारो प्रवाशांना तासन्तास खोळंबा सहन करावा लागला.
Ashadhi Wari return traffic jam on Kurduwadi Barshi road at Ridhore Seena river bridge affecting ST buses and devotees in Solapur

Ashadhi Wari return traffic jam on Kurduwadi Barshi road at Ridhore Seena river bridge affecting ST buses and devotees in Solapur

Sakal

Updated on

माढा : पंढरपूर येथील आषाढीवारी आटोपून मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने परतणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे रविवारी (ता. २६) कुर्डूवाडी–बार्शी मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. विशेषतः रिधोरे येथील सीना नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना तासंतास खोळंबा सहन करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com