मोहोळ - मूळचे पाटकुल, ता. मोहोळ येथील रहिवाशी व सध्या पुणे येथील पार्वती पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल नामदे यांना नुकतेच 'पोलीस शौर्य पदका'ने सन्मानित करण्यात आले. यामुळे पाटकुल व परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. .सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदे यांचे प्राथमिक शिक्षण शिवाजी हायस्कूल पाटकुल व महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले. शालेय शिक्षण झाल्या नंतर पोलीस सेवेची आवड असल्याने 2006 मध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले..त्यानंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन 2013 मध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. निवड झाल्या नंतर पहिलीच नेमणूक गडचिरोली येथे झाली. त्या नंतर 2023 पर्यंत गडचिरोली येथे सेवा बजावली.कामाची चुनुक पाहून गडचिरोली येथील "कमांडो 60" या नक्षली विरोधी अभियान राबविणाऱ्या पथकाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. दरम्यान नक्षली समवेत होणाऱ्या चकमकीत सातत्याने सक्रिय सहभाग घेतला..त्यावेळी नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर, नक्षलींना शरण येण्यास भाग पाडणे, त्यांच्या कडील शस्त्रे हस्तगत करणे, तसेच पोलीस पथका विरोधात लावलेली स्फोटके ब्लास्टिंग यांचा शोध घेऊन ती नाश करणे या विशेष कामगिरी केल्या..कामाचा सततचा चढता आलेख पाहून 2016 साली विशेष सेवा पदक, खडतर सेवा पदक, केंद्र शासनाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक, 2017 मध्ये पोलीस महासंचालक पदक, तसेच 2021 मध्ये झालेल्या पोलीस नक्षली चकमकी दरम्यान च्या कारवाई मुळे वेग वर्दीत पदोन्नती सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती झाली. या सर्व कामांची दखल घेत 29 जुलै 2025 रोजी राज्यपालांच्या हस्ते पोलीस शौर्य पदक प्रदान करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.