सोलापुरातील सिव्हिल, अश्विनी, यशोधरा  डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्‍चित  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

collcetor solapur

कोव्हीड केअर सेंटर म्हणून 25 ठिकाणे निश्‍चित 
सोलापूर जिल्ह्याकरिता कोव्हीड केअर सेंटर म्हणून 25 ठिकाणे निश्‍चित करण्यात आले आहेत. या ठिकाणांची बेडची क्षमता 4 हजार 860 आहे. डेडिकेटेड हेल्थ सेंटर म्हणून 12 ठिकाणे निश्‍चित करण्यात आले आहेत. येथील बेडची क्षमता 729 आहे. डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून सहा ठिकाणे निश्‍चित करण्यात आले असून येथील बेडची क्षमता 758 आहे. 

सोलापुरातील सिव्हिल, अश्विनी, यशोधरा  डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्‍चित 

सोलापूर : कोरोना विषाणूंच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सोलापूर शहरासाठी "कोव्हीड केअर सेंटर, "डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर' आणि "डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल'साठी विविध 18 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यामध्ये डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र (सिव्हिल हॉस्पिटल) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी हॉस्पिटल आणि यशोधरा हॉस्पिटल यांच्या इमारती निश्‍चित करण्यात आल्या आहेत. कोव्हीड केअर सेंटर म्हणून नऊ आणि डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून सहा हॉस्पिटल निश्‍चित करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढला आहे. 

हेही वाचा - "कोरोना'ने शाळा बंद...पण शिक्षण मात्र सुरू 

कोव्हीड केअर सेंटर इमारती आणि तेथील उपलब्ध बेड संख्या याप्रमाणे : पोलिस प्रशिक्षण केंद्र, केगांव (490), वाडिया हॉस्पिटल ( 50), रेल्वे प्रशिक्षण केंद्र (20), सिंहगड इन्स्टिट्यूट (800), पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (275), भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज (190), ऑर्किड कॉलेज (130), गर्व्हन्मेंट कॉलेज (280), वालचंद कॉलेज (590). डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर म्हणून सहा हॉस्पिटल निश्‍चित करण्यात आली आहेत. या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टर वैद्यकीय मनुष्यबळ आणि ऑक्‍सिजन पुरविणारी यंत्रणा असणार आहे. डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरची नावे या प्रमाणे, कंसात उपलब्ध बेड संख्या- ईएसआय हॉस्पिटल (80), युगंधर हॉस्पिटल(40), लोकमंगल हॉस्पिटल (50), रेल्वे हॉस्पिटल (20), मुळे हॉस्पिटल (250), सीएनएस हॉस्पिटल (100). डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , अश्विनी हॉस्पिटल आणि यशोधरा हॉस्पिटलच्या इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्‍टर, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, बीएलएस रुग्णवाहिका आदीची सोय आहे. श्री. शिवाजी छत्रपती महाराज सर्वोपचार केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 बेडची क्षमता आहे. अश्विनी आणि यशोधरा हॉस्पिटल मध्ये प्रत्येकी 250 बेडची क्षमता आहे.

Web Title: Assured Civil Ashwini Yashodhara Dedicated Covid Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaLeo Horoscope
go to top