मैदानही तेच अन्‌ डावही तोच, बदलले फक्त चेहरे-मोहरे! | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Subhash Desmukh, Vijaykumar Desmukh, Dilip Mane
मैदानही तेच अन्‌ डावही तोच, बदलले फक्त चेहरे-मोहरे!

मैदानही तेच अन्‌ डावही तोच, बदलले फक्त चेहरे-मोहरे!

सोलापूर : राजकारणात (Politics) कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, याची प्रचिती सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Market Committee) राजकारणात येऊ लागली आहे. प्रशासकाच्या माध्यमातून बाजार समिती ताब्यात मिळवण्याचा तोच डाव दुसऱ्यांदा खेळला जाऊ लागला आहे. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून सोलापूर बाजार समितीला ताब्यात ठेवण्यासाठी खेळला गेलेला तोच डाव आणि तेच मैदान जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी फरक फक्त एवढाच आहे की, सत्तेतील आणि विरोधातले मोहरे-चेहरे मात्र आता बदलले आहेत. (At present, the politics of BJP leaders in the market committee elections is being discussed)

हेही वाचा: शरद पवारांमधील 'साहेब' सुशीलकुमार शिंदेंमध्येही दिसले, पण...

राज्याचे सहकार व पणनमंत्री होऊन देखील सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना त्यावेळी बाजार समितीवर सभापती असलेले दिलीप माने (Dilip Mane) जड वाटत होते. दिलीप माने यांना बाजार समितीमधून दूर करण्यासाठी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राजशेखर शिवदारे (Rajshekhar Shivdare) व सुरेश हसापुरे (Suresh Hasapure) या कॉंग्रेसजनांचा (Congress) आधार घेतला. समितीवर प्रशासक आणा म्हणून सुभाष देशमुख यांच्या बाजूने गेलेले हसापुरे-शिवदारे बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र दिलीप माने यांच्या सोबत राहिले होते हे विशेष. तत्कालीन सभापती दिलीप माने यांना हटविण्यासाठी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून प्रयत्न केलेल्या शिवदारे यांना समितीत पुन्हा येण्यासाठी कोणत्याच पॅनेलमधून उमेदवारीची संधीही मिळाली नाही. हसापुरे यांना संधी मिळाली पण विजयाचा गुलाल मात्र उधळता आला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले सुभाष देशमुख व मंत्री विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांचे पॅनेल बाजार समितीच्या निवडणूक आखाड्यात एकामेकांच्या विरोधात उभे होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) हा किस्सा त्यावेळी विधानसभेत बाजार समितीचे हे राजकारण चारचौघांत सांगितले होते.

त्यावेळी हवेहवेसे वाटणारे आमदार विजयकुमार देशमुख आता मात्र विद्यमान संचालक मंडळातील काही संचालकांना व बाजार समितीच्या बाहेर राहूनही बाजार समितीतच जीव गुंतलेल्यांना नकोसे का वाटू लागले आहेत? याचे उत्तर मात्र अद्यापही गुलदस्तातच आहे. सभापती देशमुख यांना बाजार समितीमधून हटविण्यासाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्याकडे धाव घेण्यात आली आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा आदेश अंमलबजावणीसाठी पुढे पाठविणारे जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे (Kundan Bhole) यांनी तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या काळात सोलापूर बाजार समितीचे प्रशासक म्हणूनही काम पाहिलेले आहे, हा देखील योगायोगच म्हणावा लागेल.

शहर उत्तरच्या आमदारकीप्रमाणेच विजयकुमार देशमुख यांनी बाजार समितीच्या राजकारणात सध्या तरी आपली खुर्ची आणि गट भक्कम केला आहे. त्यामुळे त्यांना या पदावरून दूर करण्यासाठी पुन्हा एकदा तोच डाव आखण्यात आला आहे. अविश्वासाचा डाव उधळून लावण्यात यशस्वी ठरलेले आमदार तथा बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांच्या चाणाक्षपणाचा व राजकारणातील मुत्सद्दीपणाचा आता खरा कस लागणार आहे. माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe), नगरसेवक तौफिक शेख (Toufiq Shaikh), नगरसेवक आनंद चंदनशिवे (Anand Chandanshive) यांना आपल्या सोबत घेत व माजी महापौर ऍड. यू. एन. बेरिया (U. N. Beria) यांचा हातचा शिल्लक ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला (BJP) तथा आमदार विजयकुमार देशमुख यांना मोठे आव्हान आगामी काळात उभे करण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. त्यातच आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची चौकशी, प्रशासक नेमण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांना एकाच वेळी बाजार समिती आणि महापालिका दोन्ही ठिकाणी खिंड लढवावी लागणार आहे.

हेही वाचा: टेंभुर्णी हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ठार

नाव तक्रारदारांचे, डोके कोणाचे?

बाजार समितीवर यापूर्वी दोन वेळा प्रशासक आल्यानंतरही त्यातून काय निष्पन्न झाले? याचे उत्तर आजही ना पणन विभागाकडे आहे ना सहकार विभागाकडे आहे. बाजार समितीवर प्रशासक आणण्यासाठी तक्रारदार म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दोघांची नावे आहेत. त्या नावांना मंत्रालय दरबारी फारशी ओळख असल्याचेही दिसत नाही. सहकार मंत्र्यांकडून त्यांच्या तक्रारीची लगेच घेतलेली दखल आणि जिल्हा विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी पथक? याच्यात काही तरी गडबड नक्कीच दडली आहे. नाव तक्रारदाराचे असले तरीही यात डोके नक्की कोणाचे? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top