टेंभुर्णी हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ठार | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident
टेंभुर्णी हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ठार

टेंभुर्णी हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ठार

टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या (Tembhurni Police Station) हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये (Accident) दोघेजण ठार झाले. टेंभुर्णीतील कुर्डुवाडी चौकात ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्‍टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात बुधवारी (ता. 5) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. तर दुसऱ्या अपघातामध्ये सोलापूर- पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) सापटणे (टें) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. (Two tragic accidents took place at Tembhurni police station on Wednesday evening)

हेही वाचा: सोलापूर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात! चार तरुण ठार, एक गंभीर

याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, अंगद पांडुरंग ढवळे (वय 55, रा. सापटणे टें, ता. माढा) हे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एमएच 45 - एएच 5115) वरून टेंभुर्णीतील कुर्डुवाडी चौकातून करमाळा (Karmala) चौकाकडे जात असताना वळणावर ऊस घेऊन जाणाऱ्या बिगर नंबरच्या ट्रॅक्‍टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे अंगत ढवळे हे पाय व डोक्‍यास मार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम टेंभुर्णीतील खासगी रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी इंदापूरला (Indapur) नेले. परंतु उपचारापूर्वीच अंगत ढवळे यांचा मृत्यू झाला. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात जाबुवंत पांडुरंग ढवळे (वय 47, रा. सापटणे टें) यांनी ट्रॅक्‍टर चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

दुसऱ्या अपघातामध्ये यशवंतनगर (अकलूज) (Akluj) येथील अक्षय सुनील खिलारे (वय 27), त्याचा सावत्र भाऊ विनायक सुनील खिलारे, सौरभ लकडे व रोहित धांडोरे हे चौघेजण दोन मोटारसायकलवरून बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रोहित धांडोरे यास नवीन मोटारसायकल खरेदी करण्यासाठी सोलापूरला गेले होते. नवीन मोटारसायकल खरेदी करून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विनायक खिलारे हा त्याच्याकडील मोटारसायकलवर (क्र. एमएच 45 - एके 1529) रोहित धांडोरे नवीन मोटारसायकलवर तर अक्षय खिलारे व सौरभ लकडे हे दोघे एका मोटारसायकलवरून अकलूजला परत निघाले.

हेही वाचा: कांदा लिलावाला 'या' दिवशी सुटी! सोलापूर बाजार समितीचा निर्णय

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर- पुणे महामार्गावर सापटणे टें गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने विनायक सुनील खिलारे याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर महामार्गावर लोकांची गर्दी झाली होती. पाठीमागून आलेल्या अक्षय खिलारे, रोहित धांडोरे व सौरभ लकडे हे गर्दी पाहून घटनास्थळी थांबले असता मोटारसायकलवर पुढे आलेल्या विनायक खिलारे अपघातामध्ये ठार झाल्याचे दिसले. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अक्षय खिलारे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top