esakal | आतकरे कुंटुंबास सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्नशील ; जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर
sakal

बोलून बातमी शोधा

milind shambharakar

आतकरे कुंटुंबास सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्नशील ; जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर): "देगाव(ता.मोहोळ) येथील फुटलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेलेलेल्या विनायक आतकरे यांच्या कुंटुंबीयांना शासन स्तरावरुन सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे." असे मत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी देगाव(वा)(ता.मोहोळ)येथेआतकरे कुंटुंबांचे सांत्वन करताना व्यक्त केले.पावसामुळे बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता खराब झाल्याने भरपावसात त्यांनी ट्रॅक्टर मधून जावून बंधाऱ्याची व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

मोहोळ तालुक्यातील देगाव(वा)येथील भोगावती नदीवरील अतिवृष्टीमुळे व दुरुस्तीच्या निकृष्ट कामामुळे फुटलेल्या बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहातून वाहत जावून मृत्यू पावलेल्या शेतकरी विनायक कृष्णात आतकरे(वय-५५)यांचा गुरुवारी(ता.७)मृत्यू झाला होता.सदर आतकरे कुंटुंबीयांच्या सांत्वनासाठी व बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,आमदार यशवंत माने,जि.प.सदस्य उमेश पाटील,मोहोळचे तहसिलदार प्रशांत बेडसे-पाटील,नायब तहसिलदार भालचंद्र यादव,पंचायत समिती सदस्य अंजिक्यराणा पाटील,मोहोळच्या सभापती रत्नमाला पोतदार,सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एम.टी.जाधवर, पाटबंधारे उपविभाग बार्शीचे उपअभियंता श्री.कुलकर्णी यांनी आतकरे कुटूंबियांच्या घरी जाऊन भेट घेऊन सांत्वन केले.

देगाव(ता.मोहोळ)येथील कोल्हापूर पध्द्तीचा बंधारा मोहोळ-वैराग रोडपासून एक किलोमीटर अंतरावर आहे.त्याठिकाणी जाणारा रस्ता खराब व चिखलमय झाल्याने वाहनाचा ताफा रोडवर उभा करण्यात आला होता.जिल्हाधिकार्‍यांसह इतर अधिकारी व पदाधिकारी यांनी ट्रॅक्टरमध्ये उभारुन प्रवास करत बंधाऱ्याची व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.संबंधित पाटबंधारे विभागाच्या आधिकाऱ्यांकडून जाग्यावरच जिल्हाधिकाऱ्यां नी कामाबाबत माहिती घेऊन बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त केली. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल तयार करून काम चांगले करण्या च्या सक्त सूचना दिल्या.तसेच मयत शेतकरी विनायक आतकरे यांच्या घरी जाऊन कुटूंबियाची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी कुटूंबियाला मानसिक आधार देत शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

हेही वाचा: समाजासाठीचे योगदान पाहून उमेदवारी देणार ; डाॅ धवलसिंह मोहिते-पाटील

यावेळी जि प सदस्य उमेश पाटील,पं स सभापती रत्नमाला पोतदार,पं स सदस्य अजिंक्यराणा पाटील,सोलापूर जिल्हा दुध संघाचे संचालक दीपक माळी,तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील,नायबतहसीलदार भालचंद्र यादव, नरखेड मंडलाधिकारी श्री. पांढरे,सरपंच आण्णासाहेब घोडके,उपसरपंच अमर आतकरे,माजी सरपंच बबन दगडे, राजकुमार पाटील,दतात्रय आतकरे,महेश दगडे,नितेश आतकरे,तेजस आतकरे, तलाठी,ग्रामसेविका राणी चव्हाण,ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

"शासनाकडून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी चार लाख रुपयांची मदत तातडीने देण्यात येईल तसेच आतकरे कुटुंबीयांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकार्‍यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावा"

-मिलींद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर

देगाव(ता.मोहोळ)येथील बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे भरपावसात व चिखलातून ट्रॅक्टर मधून प्रवास करत बंधाऱ्यावर पोहोचले मात्र या ठिकाणी भिमा पाटबंधारे लाभक्षेत्र विकार प्राधिकरणचे अभियंता धिरज सावे उपस्थित राहणे अपेक्षीत असताना ते उपस्थित नव्हते.

loading image
go to top