
मोहोळ शहरातील कुरुल रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा सलग तिसऱ्या वेळी प्रयत्न झाला.
मोहोळ : एटीएम फोडण्याचा प्रयत्न, सलग तिसरी घटना, पोलिसांना चोरटयांचे अवाहन
मोहोळ - मोहोळ शहरातील कुरुल रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा सलग तिसऱ्या वेळी प्रयत्न झाला असून, एटीएम फोडीचे मोहोळ तालुक्यातील सत्र थांबता थांबेना. शुक्रवार ता 29 रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा तेच एटीएम फोडण्याचा आज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी मोहोळ पोलिसासमोर मोठे आवाहन उभा केले आहे.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ ते कुरूल रस्त्यावर भर चौकात स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा असून, त्या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी एटीएम आहे. एटीएम रूम मध्ये एक पैसे भरण्याचे व दुसरे पैसे काढण्याचे अशी दोन मशीन आहेत. पैसे काढण्याच्या एटीएम मशीन ची देखभाल सोलापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेकडून केली जाते, तर पैसे भरण्याच्या एटीएम मशीनची देखभाल मोहोळ येथील बँकेच्या शाखेमार्फत केली जाते.
शुक्रवार ता 29 रोजी दिवसभर बँकेचे कामकाज सुरू होते. दुपारी चार वाजता बँक बंद झाल्यानंतर बँकेतील सर्व कर्मचारी बँकेचे कामकाज जुळवत होते. काही कर्मचारी गेले होते तर काहीजण कामकाज करीत बसले होते. रात्री आठ वाजता बँक बंद करून बँकेचे सर्विस मॅनेजर सुनील कुंडलिक गाडे वय 57 रा सोलापुर हे ही घरी गेले. शनिवारी सकाळी बँकेचे मुख्य मॅनेजर उत्तमराव गावडे यांनी गाडे यांना फोन करून बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असुन तातडीने या असे सांगितले.
दोघे ही एटीएम रूम मध्ये आले असता त्या ठिकाणी पैसे भरण्याच्या एटीएम मशीनची दगडाने तोडफोड केल्याचे दिसले, तर मशीन मधील रोख रकमेची चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनाला आले, तर एटीएम च्या बाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड केल्याचे निदर्शनास आले. एटीएम मशीनचे व कॅमेऱ्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आतील रक्कम किती चोरीला गेली याचा तपशील बँकेकडून पोलिसांना मिळाला नाही. या प्रकरणी सर्विस मॅनेजर सुनील गाडे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे हे करीत आहेत.
Web Title: Attempt To Break Atm Third Time Incident Thieves Called To The Police Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..