मुलाने जन्मदात्या आईलाच संपविले ! आईने जुगारासाठी पैसे दिले नाहीत

मुलाने जन्मदात्या आईलाच संपविले ! बायको सोडून गेली, आईने जुगारासाठी पैसे दिले नाहीत
Crime
CrimeGallery
Updated on
Summary

डोक्‍यावर परिणाम झालेल्या मुलाने आईकडे जुगारासाठी पैसे मागितले. फिट येत असलेल्या मुलावर औषधोपचार सुरू होते. सोलापूर बाजार समितीत तो मिळेल ते काम करत होता.

सोलापूर : डोक्‍यावर परिणाम झालेल्या मुलाने आईकडे जुगारासाठी पैसे मागितले. फिट येत असलेल्या मुलावर औषधोपचार सुरू होते. सोलापूर बाजार समितीत (Solapur Market Committee) तो मिळेल ते काम करत होता. मात्र, त्याला जुगाराचे व दारूचे व्यसन होते. आईने जुगारासाठी पैसे न दिल्याच्या रागातून त्याने सोमवारी (ता. 23) पहाटे दीडच्या सुमारास लोखंडी फुकारीने आईच्या डोक्‍यावर मारून खून (Crime( केला. आईचा खून केल्याप्रकरणी अतुल एकनाथ कोळेकर (रा. मित्रनगर, परमशेट्टी मिलमागे) याला जोडभावी पेठ पोलिसांनी (Jodbhavi Peth Police Station) अटक केली आहे.

Crime
गुरुवर्य स्वामी आनंदयोगी महाराज यांचे देहावसान

अतुल लहान असतानाच त्याचे वडील एकनाथ यांनी जगाचा निरोप घेतला. तर त्याच्या भावाचाही 2019 मध्ये मृत्यू झाला होता. वडिलांच्या पश्‍चात आईने दोन्ही मुलांचा सांभाळ करून त्यांना वाढविले. मात्र, एका मुलाने आई वंदना कोळेकर (वय 48) यांची साथ सोडली आणि तोही 2019 मध्ये मयत झाला. एकट्या मुलाच्या कमाईतून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. अतुलही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली करीत होता. परंतु, त्याच्या डोक्‍यावर परिणाम झाला होता आणि त्याला अधूनमधून फिट्‌स येत होते. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. 15 महिन्यांपूर्वी कर्नाटकातील एका मुलीशी त्याचा विवाह झाला होता. मात्र, त्याच्या त्रासाला कंटाळून तीदेखील काही महिन्यांपासून माहेरी कर्नाटकातील धनगरवाडी येथे राहायला गेली होती. अतुलने आईकडे जुगारासाठी पैशांची मागणी केली. मात्र, आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला.

तत्पूर्वी, रविवारी (ता. 22) रात्री दहाच्या सुमारास कोळेकर यांच्या घरातील भाडेकरू घरात टीव्ही पाहात झोपी गेले होते. थोड्यावेळाने त्यांना घरमालकीण वंदना कोळेकर व त्यांचा मुलगा अतुल कोळेकर यांच्या भांडणाचा आवाज कानी पडला. त्यावेळी वंदना कोळेकर यांनी "भाऊ भाऊ' म्हणून भाडेकरू राजकुमार गुलाब कलावंत यांना आवाज दिला. त्यावेळी ते खाली आले आणि पाहिले, असता त्यावेळी अतुल हा आईला लोखंडी फुकारीने डोक्‍यावर वार करीत होता. रक्‍तस्राव होत असतानाही त्याने मारहाण सुरूच ठेवली. त्यांनी आईला का मारतो, अशी विचारणा केली. त्यावेळी अतुल म्हणाला, "तू मध्यस्थी करू नकोस, नाहीतर तुलाही मारून टाकेन'. त्यामुळे राजकुमार कलावंत तिथून निघून गेले. खुनानंतर अतुल हातपाय धुवून घराबाहेर पडला. घटनेनंतर कलावंत यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अतुल कोळेकर याला पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चौकशीत अतुलने पोलिसांना सांगितले, की आईकडे पैसे मागितले, परंतु तिने पैसे दिले नाहीत म्हणून खून केला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम करीत आहेत.

Crime
नोकरी करत उभारले बायोटेक पार्क! संशोधनातून शेतकऱ्यांची सेवा

वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणाले...

  • डोक्‍यावर परिणाम झाल्याने अतुलवर फिटचा औषोधोपचार सुरू होता

  • बाजार समितीत मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवत होता मुलगा

  • पतीच्या त्रासाला वैतागून पत्नीने गाठले होते माहेर; 15 महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

  • दारू अन्‌ जुगाराचे होते व्यसन; आईने पैसे न दिल्याच्या रागातून केला खून

  • जोडभावी पेठ पोलिसांनी खून करणाऱ्या मुलाला (अतुल एकनाथ कोळेकर) केली अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

ashti medium project water storage 60 percent farmers demand eight hours electricity supply for irrigation in mohol solapur
Maharashtra Rain Update Ujani Dam Almost Full 40000 Cusecs Released Through 16 Gates into Bhima River
POCSO Case
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com