जप्त वाळूसाठ्याचा १७ नोव्हेंबरला लिलाव | sand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाळू पट्टा
जप्त वाळूसाठ्याचा १७ नोव्हेंबरला लिलाव

जप्त वाळूसाठ्याचा १७ नोव्हेंबरला लिलाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माळीनगर : माळशिरस तालुका प्रशासन व पोलिसांनी जप्त केलेल्या १०६ ब्रास वाळूसाठ्याचा लिलाव बुधवारी (ता.१७) होणार आहे. तरी यामध्ये भाग घेण्यासाठी इच्छुकांनी तहसीलदार माळशिरस यांच्याकडे १६ नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत लेखी अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी (अकलूज) डॉ.विजय देशमुख यांनी केले आहे.

हेही वाचा: शेगाव : ‘लालपरी’ थांबल्याने खासगीला ‘अच्छे दिन’

१७ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता तहसीलदार माळशिरस, तहसील कार्यालय माळशिरस यांच्या निजी कक्षात लिलाव करण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूज व तहसील कार्यालय माळशिरस याठिकाणी ५४.५४ ब्रास, अकलूज पोलिस स्टेशन येथे ७४.७७ ब्रास व वेळापूर पोलीस स्टेशन येथे ३२.७० ब्रास जप्त केलेला वाळूसाठा आहे. इच्छुक व्यक्तींनी याठिकाणी असलेल्या वाळूसाठ्याची पाहणी करून लिलावात भाग घ्यावा. लिलावाच्या अटी व शर्ती तहसील कार्यालय माळशिरस येथे नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत.

loading image
go to top