
सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे- माने या सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर आर्थिक अपहारासंदर्भात गुन्हा दाखल करावा, असा अर्ज डॉ. उमा वळसंगकर यांनी सदर बझार पोलिसांना दिला आहे. त्यावर आता मनीषा यांनी ‘मी रुग्णालयात आर्थिक अपहार केला की नाही? यातील सत्यता बाहेर येण्यासाठी डॉ. शिरीष यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली आणि वळसंगकर हॉस्पिटलच्या बॅंक खात्याचे लेखापरीक्षण (ऑडिट) व्हावे’, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.