
सोलापूर : आयुष्यमान भारत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना कार्ड देण्यासाठी सर्वाधिक प्रस्ताव सादर करण्यात सोलापूर जिल्हा राज्यात नंबरवन ठरला आहे. गेल्या तीस दिवसांमध्ये महाराष्ट्रातून १० लाख ७० हजार ७२९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख ५२ हजार ४७ प्रस्ताव हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नियोजनातून जिल्ह्यात आशा वर्कर, रेशन दुकानदार, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्या माध्यमातून ही कामगिरी साध्य झाली आहे.