Solapur News : बबनराव आवताडेचा प्रणिती शिंदेना पाठींबा ?

अभिजीत पाटील यांच्या जाण्याने रिकामी होणारी पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसचे नेत्याकडून अनेकांशी संपर्क साधला जात आहे.
babanrao autade support to praniti shinde lok sabha election 2024 politics
babanrao autade support to praniti shinde lok sabha election 2024 politicsSakal

मंगळवेढा : लोकसभा निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोपावरून मोठी चुरस निर्माण झाली असतानाच तालुक्यातील सहकारातील जेष्ठ नेते बबनराव आवताडे व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांची काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भेट घेतल्यामुळे अवताडे गटाचा पाठिंबा काँग्रेसला देण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने काॅग्रेस उमेदवारासाठी हा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. पण ही भूमिका उद्या जाहीर होणार आहे

यंदाची लोकसभा निवडणूक मोठी चुरशीची ठरणारे होत आहे यापूर्वीच्या दोन निवडणुकीत मंगळवेढा पंढरपूर मधून काँग्रेस मताधिक्य मिळाले मात्र यंदाच्या निवडणुकीत स्थानिक आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून भाजप उमेदवार मताधिक्य मिळेल असा विश्वास असल्याने त्या दृष्टीने भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या नेत्याने प्रयत्न करीत आहेत तर तालुक्यात खरीप हंगामाचा न मिळालेला पिक विमा, शेतीचे पाणी, टँकरचे पाणी,वीज, दुष्काळ निधी विषयावरून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

ती नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने स्वतः समाधान आवताडे व प्रशांत परिचारक हे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या सोबतीला शिवसेनेचे प्रतिक किल्लेदार अशोक चौंडे राष्ट्रवादीचे अजित जगताप प्रवीण खवतोडे अन्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी तर दुसऱ्या बाजूला प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच संपूर्ण तालुक्याचा गाव भेट दौरा केला.

त्यामध्ये पाठखळ वगळता अन्य गावात चांगला प्रतिसाद मिळाला.दरम्यान त्यांच्या प्रचारात आग्रही असलेले विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी नुकतेच भाजपला समर्थन केले तर सध्या तालुक्यात भागीरथ भालके हे एकमेव त्यांचा आक्रमकपणे प्रचार करीत आहेत.

अभिजीत पाटील यांच्या जाण्याने रिकामी होणारी पोकळी भरून काढण्यासाठी काँग्रेसचे नेत्याकडून अनेकांशी संपर्क साधला जात आहे. दरम्यान आज काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बबनराव अवताडे व सिद्धेश्वर अवताडे यांची भेट घेत राजकीय चर्चा केली भेट घेतली चर्चेचा तपशील समोर आला नसला

तरी ही भेट तालुक्याच्या राजकीय वर्तुळात निर्णायक ठरणार आहे. बबनराव अवताडे यांचे विकास सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक गावात कार्यकर्ते जोडले आहेत तर शहरात सिद्धेश्वर अवताडे यांच्या माध्यमातून युवा कार्यकर्ते जोडले आहेत त्यामुळे या दोघांची भूमिका लोकसभेसाठी मंगळवेढ्यातून महत्त्वाचे ठरणार आहे

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज बबनराव अवताडे यांची भेट घेऊन चर्चा केली यासंदर्भात शहर व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांन आम्ही बोलावून त्यांच्याशी चर्चा करून याबाबतचा निर्णय उद्या जाहीर करणार आहोत.

- सिद्धेश्वर आवताडे अध्यक्ष खरेदी विक्री संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com