वाळूज : ढगाळ हवामानमुळे बळीराजा चिंतेत | Waluj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढगाळ हवामान आणि अवकाळीमुळे बळीराजा संकटात
ढगाळ हवामान आणि अवकाळीमुळे बळीराजा संकटात , द्राक्ष , तूर , हरभरा पिकांवर रोगराईची भिती

वाळूज : ढगाळ हवामान आणि अवकाळीमुळे बळीराजा संकटात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाळूज : ढगाळ हवामानामुळे बळीराजाच्या शेतातील पिके आणि फळबागा पुन्हा संकटात सापडत असून ढगाळ हवामान आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष, तूर, हरभरा या पिकांसह फळभाज्या व पालेभाज्यांवर मावा, तुडतुडे, मिलिबग, कीड, अळी यासह रोगराई पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा: मळेगाव : सेवानिवृत्त जवानाची बैलगाडीतून मिरवणूक

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व जिल्हा कृषी हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ (सोलापूर) यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १६ ते १७ नोव्हेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्‍यता असल्याचा इशारा जिल्हा कृषी हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ यांनी दिला आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, कांदा याबरोबरच पालेभाज्या, फळभाज्या तसेच द्राक्ष, पेरु, डाळिंब, सिताफळ, पपई या फळबागासह पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील पिकांत गुडघ्या मांड्याएवढे पाणी साठल्याने पिके सडून गेली. खरीप हंगाम वाया गेला असतानाच रबी हंगामातील ज्वारी, हरभरा यासह विविध पिके चांगली आली असताना पुन्हा हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता वर्तविल्याने जिल्ह्यातील बळीराजापुढे अवकाळीचे संकट उभा ठाकले आहे.

loading image
go to top