

“Baliram Sathe’s Big Decision
Sakal
वडाळा : गेल्या सहा महिन्यांपासून पक्षश्रेष्ठींशी चर्चा होऊनही कुठलाही तोडगा निघाला नाही. मला डावलून परस्पर पदाधिकारी निवडी केल्या. माझी दखलही घेतली जात नसल्यामुळे यापुढे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करीत आहे. यापुढे उत्तर सोलापूर तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन आम्ही अपक्ष जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहोत, अशी घोषणा ज्येष्ठ नेते बळिराम साठे यांनी केली.