
-प्रकाश सनपूरकर
सोलापूर : इस्राईल आणि इराणच्या युद्धजन्य स्थितीचा फटका सोलापूरच्या केळी निर्यातीला बसत आहे. इराणच्या अब्बास बंदरावर साधारण २०० कंटेनर अडकले आहेत. यामुळे मालाचा मोबदला निर्यातदारांना मिळण्यास विलंब लागणार आहे. या स्थितीत आता नव्याने केळी निर्यातीची अडचण झाली आहे.