

Bananas rotting on trees as farmers struggle with export halt and unpaid dues.
sakal
चिखलठाणा: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सात-आठ आठवड्यांपासून मागणी नसल्याने काढणीला आलेली केळी झाडावरच पिकू लागली. काढणीला आलेली केळी शेतातच नासू लागली. यामुळे ‘दर तुमच्या मनाने ठरवा; पण केळी घेऊन जा,’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातच मागील महिन्यांत विकलेल्या केळीचे पैसेही व्यापाऱ्यांकडून मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.