वारकऱ्यांना मठाबाहेर काढले तर वारकरी रस्त्यावर येतील; बंडा तात्या कराडकरांचा पोलिसांना इशारा

Banda Tatya Karadkar has warned the police that if Warakaris are taken out of the monastery, Warakaris will come on the streets.
Banda Tatya Karadkar has warned the police that if Warakaris are taken out of the monastery, Warakaris will come on the streets.
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : माघी यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांना पोलिसांनी मठा बाहेर काढू नये. अन्यथा वारकरी पोलिसांविरोधात एकत्रित येवून रस्त्यावर उतरतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ कीर्तनकार बंडा तात्या कराड यांनी पंढरपुरात दिला आहे.

माघी यात्रेच्या दरम्यान पोलिस आणि वारकरी असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. चार प्रमुख यात्रांपैकी एक असलेली माघी यात्रा मंगळवारी (ता.23) साजरी होत आहे. यात्रेसाठी राज्य भरातून वारकरी पंढपुरात आले आहेत. विविध मठांमध्ये वारकरी राहत आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने  माघी यात्रा रद्द केली आहे. वारी दरम्यान होणारी वारकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने  सोमवारी (ता.22)  मध्यरात्री 12 वाजलयापासून ते मंगळवारी (ता 23) मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील दहा गावांमध्ये संचार बंदी लागू केली आहे. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंगळवार व बुधवार असे दोन दिवस भाविकांना मुखदर्शन मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने संचार बंदीचा निर्णय उशिराने घेतल्याने अनेक भाविक शहरातील व परिसरातील विविध मठांमध्ये वास्तव्यास आले आहेत. मठांमध्ये वास्तव्यास असलेल्या वारकऱ्यांना आता पोलिसांनी मठा बाहेर काढण्याची मोहिम सुरू केली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत मठ सोडून पंढरपूर शहराबाहेर जाण्याचे आदेश दिले आहेत. वारकऱ्यांवर गुन्हे दाखल केली जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर बंडा तात्या कराडकर यांनी पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करत वारकऱ्यांना मठा बाहेर काढण्याच्या पोलिस मोहिमेला विरोध दर्शवला आहे.

पोलिसांनी वारकऱ्यांना संताप येईल, अशी कोणतीही गोष्ट करू नये, जर बळाचा वापर करून वारकऱ्यांना मठामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर वारकरी रस्त्यावर येवून आंदोलन देखील करतील, अशा इशारा ही कराड यांनी दिला आहे. ऐन यात्रा काळात पोलिस आणि वारकरी यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळात प्रशासनाने यापूर्वीच संचार बंदी लागू करणे आवश्यक होते. ऐनवेळी संचार बंदी लागू केल्याने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असेही कराडकर यांनी सांगितले.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेणू गोपाल आणि माधवी निगडे फाऊंडेशनच्या वतीने दहा लाख रूपयांच्या दोन ई व्हीईकल रिक्षांचा लोकार्पण सोहळा रविवारी बंडा तात्या कराडकर यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वारकऱ्यांना मठा काढण्यास विरोध केला. यावेळी मंदिर समितीच्या   सदस्य अॅड माधवी निगडे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, राणा महाराज वासकर, केशव  महाराज नामदास आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com