Forced Labour Case Exposed in Chumb Village, Barshi Taluka
Sakal
बार्शी : चुंब येथे अन्य राज्यातील एका महिलेसह तीन अल्पवयीन बालकांना मागील तीन वर्षापासून शेतातील राहते घरी वेठीला धरुन काम करुन घेतले,अन्न नाही,मोबदला नाही तसेच मुळगावी जाणेसाठी प्रयत्न केला असता जाऊ दिले नाही याप्रकरणी कामगार अधिकाऱ्यांसह पोलिस,महसूल अधिकाऱ्यांनी छापा टाकून एक जणाविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. झाकीर हुसेन इलाही सय्यद(रा.खडकोणी रोड,चुंब(ता.बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे लिपिक गणेश महादेव भगरे(वय ३०,रा. अकोले मंद्रुप ता. दक्षिण सोलापुर जि.सोलापूर)यांनी फिर्याद दाखल केली ही घटना १ सप्टेंबर २०२२ ते २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली.