

“Barshi city shocked after woman murdered in broad daylight — strangled with dupatta and stabbed on face; police investigation underway.”
Sakal
बार्शी: शहरातील उपळाई रोड, शेंडगे प्लॉट येथे फार्मसिस्टची नोकरी करणाऱ्या महिलेचा भरदिवसा राहत्या घरी ओढणीने गळा आवळून, चाकूने चेहऱ्यावर वार करून खून केला. संशयित आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान घडली.