
पांगरी : बार्शीहून पांगरीमार्गे कारीकडे जाणाऱ्या एसटी बसच्या इंजिनाच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने इंजिनमधून धूर येऊ लागला. प्रवाशांमध्ये घबराट उडाली. काहींनी खिडकीतून उड्या मारल्या तर काही दरवाजातून बाहेर पडले. हा थरारक प्रसंग ता.८ सायंकाळी सव्वा सहाच्या बार्शी-जामगाव रस्त्यावर हॉटेल शिवेंद्रसमोर घडला. चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बस थांबवली अन् संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.