prakash baviskar
sakal
बार्शी - वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत अधिकाऱ्याने आत्महत्या केली असून, गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांसह महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेने घेतल्यानंतर तब्बल बारा तासानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला असून, गुन्हा दाखल होताच मृतदेह ताब्यात घेतला.