

The dark side of private money lending surfaces in Barshi
-प्रशांत काळे
बार्शी : कौटुंबिक खर्चासाठी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्याने वेतन कमी आणि वेळेवर पगार होत नसल्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतल्यानंतर जमेल तसे फेडत असताना देखील मागील आठ महिन्यांपासून सावकारांनी तगादा लावला , हातपाय मोडू , सेवेच्या ठिकाणी गोंधळ घालू , महिला आणून छेडछाडीचा गुन्हा दाखल करु अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे पतीने आत्महत्या केली , पतीलाआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात सात खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरासह नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .