बार्शी नगरपरिषदेच्या प्रशासकपदी अमिता दगडे-पाटील यांची निवड

नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारीपदी मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांची नियुक्ती केल्याचे पत्र प्राप्त झाले असून त्यांनी पदभार स्विकारला.
Barshi Municipality
Barshi Municipalitysakal
Updated on

बार्शी (सोलापूर) : बार्शी नगरपरिषदेचा (Municipality) पाच वर्षाचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्ठात आल्याने व पुढील निवडणुकीची प्रक्रिया (Election Process) पूर्ण झाली नसल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नगरविकास मंत्रालय मुंबई यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारीपदी मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांची नियुक्ती केल्याचे पत्र प्राप्त झाले असून त्यांनी पदभार स्विकारला.

बार्शी नगरपरिषद'अवर्ग'नगरपरिषद असून 30 डिसेंबर 2016 रोजी मतमोजणी होऊन सध्याचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी सत्ता स्थापन करुन कारभार सुरु केला होता आज गुरुवारी 30 डिसेंबर 2021 रोजी कार्यकाळ संपल्याने विद्यमान मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांची शासनाने प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Barshi Municipality
बेळगावात पत्नीच्या खून प्रकरणी जवानाला जन्मेठप

सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाने अमिता दगडे-पाटील यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड होताच मावळते नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांचेसह नगरसेवक, नगरसेविका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

दरम्यान आमदार राजेंद्र राऊत यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करुन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे पाच वर्षे शहराच्या विकासासाठी केलेली मदत याबद्दल आभार व्यक्त केले.

Barshi Municipality
थर्टी फर्स्टला ज्येष्ठांनी व मुलांनी बाहेर जाणे टाळावे : जिल्हाधिकारी

यापुढे प्रशासकीय कालावधी सुरु होणार असला तरी प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागामध्ये कार्यरत राहून नागरिकांच्या अडचणी प्रशासनाला सांगाव्यात तसेच कोरोनाची तिसरी लाट, ओमिक्रॉनबाबत नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत.

पाच वर्षे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांचेसह सर्व नगरसेवकांनी बार्शी शहराच्या विकासाठी केलेले प्रयत्न याचा अभिमान असून संपूर्ण तालुक्यातील नागरिकांच्यावतीने सर्वांचे अभिनंदन असे आमदार राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com