बेळगावात पत्नीच्या खून प्रकरणी जवानाला जन्मेठप

मन्नीकेरीतील घटना; चारित्र्याच्या संशयावरून २०१३ मध्ये खून केला होता.
Court
Courtsakal
Updated on

बेळगाव : पत्नीच्या खून (Wife Murder) प्रकरणात जवानाला जन्मठेपेची शिक्षा अकरावे अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीशांनी गुरुवारी (ता.३०) ठोठावली. जकाप्पा खेमानी संभाजी (वय ४१, रा. मन्नीकोरी, ता. बेळगाव) असे शिक्षा झालेल्या जवानाचे नाव आहे. पत्नी कोमल उर्फ शालन जकाप्पा संभाजी (वय ३०) हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप त्याच्यावर होता. २४ सप्टेंबर २०१३ रोजी घटना घडली होती. (Belgaon Crime News)

याबाबत माहिती अशी की, पती जकाप्पा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरून पती आणि पत्नीमध्ये भांडण वाढल्याने कोमल या माहेरी आल्या. तसेच या प्रकरणांवरून न्यायालयात दावा दाखल होता. त्यावरती सुनावणी सुरु होती. परंतु, दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन्ही कुटुंबानी मध्यस्थी केली व भांडण मिटविले. कोमल यांना सासरी नांदायला पाठविले. त्याप्रमाणे सप्टेंबर २०१३ मध्ये त्या मन्नीकेरी येथे सासरी आल्या.

Court
स्थानिक संस्था निवडणूक; बेळगाव जिल्ह्यात भाजपला सर्वाधिक जागा

पण, तेथे परत पती-पत्नीमध्ये भांडण वाढले. जकाप्पा हा परत चारित्र्याचा संशय घेऊन मारबडव करु लागला. २४ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री दहाच्या सुमारास गळा आवळून पत्नीचा खून केला. या विरोधात सदाशिव घोटेकर यांनी काकती पोलिस ठाण्यांमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार जवानाच्य विरोधात गुन्हा दाखल झाला.

दाव्याची अंतिम सुनावणी ११ वे अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी झाली. आरोपी विरोधातीले गुन्हे शाबीत झाले. यानुसार त्याला जन्मठेपची शिक्षा ठोठाविण्यात आली. सरकारी वकील म्हणून शैलजा पाटील यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com