
वैराग : घरी कोणी नसताना महिलांना घरात घुसून दमदाटी करून अश्लील भाषा वापरली. तर दुसऱ्या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केले, तसेच जातिवाचक शिवीगाळ केली. या दोन्ही घटनांमध्ये परस्पर विरोधी फिर्यादीत पाच जणांविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.