Solapur Fraud: 'पंढरपूरच्या ठेकेदाराकडून दहा लाखांची फसवणूक'; बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
₹10 Lakh Cheating Case: रस्त्याच्या कामात पैशाची गुंतवणूक करा पैसे दुप्पट देतो असे विश्वास संपादन करून ऑनलाइनद्वारे ३ लाख ९७ हजार, २३८ रुपये, रोख ५ लाख रुपये, लॅपटॉप ५१ हजार रुपये अशी एकूण ९ लाख ४८ हजार २३८ रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Barshi Police register FIR against Pandharpur contractor in ₹10 lakh cheating case.sakal
बार्शी: ठेकेदारीमध्ये रस्त्याचे काम सुरू असताना दहा लाख रुपये गुंतवल्यास काही दिवसांत २० लाख रुपये देतो असे आमिष दाखवून विश्वास संपादन करून फसवणूक केल्याप्रकरणी एक जणाविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.