

Barshi Shines in Environmental Campaign; Civic Body to Receive ₹4 Crore
Sakal
बार्शी शहर : सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग असलेल्या बार्शी नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा ०.५’ अभियानात राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. बक्षीस म्हणून राज्य सरकारकडून शहरांतर्गत विकास कामांसाठी ४ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी गुरुवारी (ता. १९) डॉ. जगदाळे मामा सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.