

Sakal
बार्शी : शेंद्री (ता.बार्शी) येथे बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर एका हॉटेलजवळ एक तरुण पिस्तूल घेऊन भल्या पहाटे फिरत असल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून त्यास अटक केली पिस्तूलसह दुचाकी जप्त करुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरबाज जिलाली जमादार(वय २१ वर्षे रा.संजयनगर,वैराग ता.बार्शी जि.सोलापूर)असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिस राहूल बोंदर यांनी फिर्याद दाखल केली ही घटना गुरुवार(ता.११)रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली.