esakal | बार्शी तालुक्‍यास अतिवृष्टीसाठी 42 कोटींचा निधी मंजूर ! निधी मिळवण्यात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर 
sakal

बोलून बातमी शोधा

farm rain

बार्शी तालुक्‍यात जून ते ऑक्‍टोबर अखेर झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात 41 कोटी 23 लाख 66 हजार रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. त्याचे वाटप लवकरच सुरू होईल. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा होईल.

बार्शी तालुक्‍यास अतिवृष्टीसाठी 42 कोटींचा निधी मंजूर ! निधी मिळवण्यात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर 

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात जून ते ऑक्‍टोबर अखेर झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीपोटी पहिल्या टप्प्यात 41 कोटी 23 लाख 66 हजार रुपये शासनाकडून मंजूर झाले आहेत. त्याचे वाटप लवकरच सुरू होईल. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा होईल. अनुदान मिळवण्यात बार्शी तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली. 

जिरायत शेतीसाठी हेक्‍टरी 10 हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्‍टरी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. मृत प्रती व्यक्तीसाठी 4 लाख रुपये, मोठे पशुधन प्रती 30 हजार, लहान पशुधन प्रती 3 हजार, ओढकाम करणारे मोठे पशू प्रती 25 हजार, तर लहान पशूंसाठी प्रती 16 हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. 

शासनाच्या आदेशानुसार मनुष्यहानी, नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णपणे पडली असल्यास, कपडे, घरगुती भांड्यांचे नुकसान झाले असल्यास 12 लाख रुपये, मृत जनावरांसाठी 3 लाख 52 हजार रुपये, पडझड, अंशत: पडझड, गोठ्यांसाठी 60 लाख 60 हजार रुपये मंजूर झाले आहेत. 

शेतजमिनीच्या नुकसानीसाठी काहीही अनुदान आले नसून जिरायतसाठी 6 हजार 800 प्रतिहेक्‍टर व बहुवार्षिक पिकांसाठी 18 हजार प्रति हेक्‍टरप्रमाणे 27 कोटी 85 लाख 95 हजार रुपये तर वाढीव दराने शेती पिकांसाठी रुपये 3 हजार 200 प्रतिहेक्‍टर व बहुवार्षिक पिकांसाठी 7 हजार रुपये प्रतिहेक्‍टर प्रमाणे 12 कोटी 62 लाख 13 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. 

मदतीच्या रकमेतून बॅंकांनी कोणतीही वसुली करू नये 
बार्शी तालुक्‍यात झालेल्या नुकसानीपोटी 64 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. पहिल्या टप्यात 41 कोटी 23 लाख 66 हजार रुपये मंजूर झाले आहेत. बॅंकांना यादी देण्यात येऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम लवकरच जमा होईल. मदतीच्या रकमेतून बॅंकेने कोणतीही वसुली करू नये, असे आदेश बॅंक अधिकाऱ्यांना दिले असल्याचे तहसीलदार शेलार यांनी स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top