बार्शी : शिक्षकांची सहृदयता; अनाथासोबत केली दिवाळी साजरी

अनाथ, निराधारासोबत दिवाळी साजरी करून माणुसकीचे उत्तम दर्शन घडविले आहे.
अनाथासोबत केली  दिवाळी साजरी
अनाथासोबत केली दिवाळी साजरी sakal
Updated on

मळेगाव : श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगाव संस्थेतील शिक्षक बांधवांनी गावातील अनाथ, निराधारासोबत दिवाळी साजरी करून माणुसकीचे उत्तम दर्शन घडविले आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्या गावातील 45 मृतांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप करून सहवेदना देखील जपली आहे. शिक्षकांनी अनाथांना केलेली मदत व गावकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन दाखविलेली सहृदयता समाजाला दिशादर्शक आहे.

कर्मवीर नागनाथ मारुती गडसिंग गुरुजी यांच्या स्मरणार्थ नर्मदेश्वर शिक्षण परिवाराच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गतवर्षी कोरोना महामारीच्या काळात गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत केली आहे. शिक्षक महादेव फपाळ, प्रवीण मुंढे, सचिन कानडे, नितीन दीक्षित, नितीन पवार सर, नवाज तांबोळी सर, जैनुद्दीन शेख,विजय म्हमाणे,विनोद दीक्षित,अतुल वाघमारे,प्रदीप वाघमारे यांनी एकत्रित येत दीपावली सणाचे औचित्य साधून मळेगाव येथे अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविले.त्यानुसार करोना व इतर अल्पशा आजाराने गावातील 42 जणांचे मृत्यू झाले.त्यांच्या सुख - दुःखात सहभागी होणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

अनाथासोबत केली  दिवाळी साजरी
नाशिक : रेल्वेची आरक्षण मर्यादा संपली; प्रवाशांचे हाल

त्यानुसार शिक्षकांनी मृतांच्या कुटूंबियांचे सांत्वन करून मानसिक आधार दिला व दिवाळी फराळाचे वाटप केले.तसेच श्री नर्मदेश्वर नागनाथ महाराज मंदिरातील अन्नपूर्णा योजनेतील 17 निराधारांना दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी फराळ व इतर जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. (शिक्षक बांधवांनी ज्ञान दानाबरोबरच समाजाचं काही तरी देणे लागतो म्हणून केलेले कार्य व केलेली मदत कौतुकास्पद आहे.

शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करीत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद एक प्रकारे ऊर्जा निर्माण करतो.त्याच प्रमाणे समाजातील अनाथ,निराधार, गरजूंना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वकाही देऊन जातो.

- महादेव फपाळ-शिक्षक(श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्था मळेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com