Crime
Sakal
बार्शी : वांगरवाडी(ता.बार्शी) येथे ग्रामदैवत वेताळसाहेब दर्शनासाठी जाण्यास हलगी वाजवण्याची सुपारी घेऊन हलगी वाजवत जात असताना चौघांनी काठीने,लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले,जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.कमलेश तुपे,अनिल तुपे,समाधान नलावडे,रामदास तुपे(सर्व रा.वांगरवाडी)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत बाळू शिंदे(वय ६०,रा.वांगरवाडी)यांनी फिर्याद दाखल केली ही घटना सोमवार(ता.८)रोजी रात्री साडेनऊ वाजत घडली.