samadhan nanaware
sakal
बार्शी - कुर्डुवाडी (ता. माढा) येथील लाखों रुपयांचे मोबाईल गेमबद्दल शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाचे प्रकरण गाजले असतानाच बार्शी तालुक्यातही मोबाईलवरील चक्री गेमने तरुणांना भूरळ पाडली असून, अनेक तरुणांनी कुटुंबाच्या परस्पर लाखो रुपये उधळून कर्जबाजारी झाल्याने मृत्यूला जवळ करुन जीवन संपविले आहेत. कुसळंब (ता. बार्शी) येथील तरुणाने चक्री गेमच्या व्यसनाने कर्जाचा डोंगर करुन आत्महत्या केली असून याकडे शासनाने वेळीच पायबंद घालण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.