

Barshi Woman Devotes Life to Caring for Gir and Khillar Cows
sakal
-उमेश पवार
बार्शी: बार्शी येथील अंजली कोकणे यांनी वेगळी वाट निवडत मागील सात वर्षांपासून गोसेवा आणि योगसेवेचा वसा जपला आहे. देशी गोवंशाचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने त्यांनी बळेवाडी (ता. बार्शी) येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ ‘वटवृक्ष गोशाळा’ सुरू केली आहे. त्यांच्याकडे सध्या १७ हून अधिक मोठ्या गाई आणि साधारण १५ वासरे आहेत. गीर तसेच खिलार वंशाच्या अनेक गाईंचा त्या उत्तम प्रकारे सांभाळ करतात. बार्शी शहरातील सुमारे अडीचशेहून अधिक घरांपर्यंत त्या रास्त दरात गीर गायीचे दूध पुरवतात. तसेच गीर गायीच्या दुधापासून तयार केलेले पनीर, तूप आदी पदार्थही उपलब्ध करून देतात.