
मंगळवेढा : जागेमुळे प्रलंबित महात्मा बसवेश्वर स्मारकासंदर्भात कृषी विभागाऐवजी कृष्ण तलावालगतच जागा उपलब्ध करावी, अशी सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. महात्मा बसवेश्वर स्मारकासंदर्भात बैठक मुंबई येथे घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये स्मारक समितीची माजी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शिवानंद पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपसचिव सुनील कोटेकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व प्रांताधिकारी बी. आर. माळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.