
महूद : महूद येथील वाहतुकीस अडथळा करणारे फलक तसेच दुकानदाराने रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्याबाबत शनिवारी सायंकाळी पोलिस सूचना देत होते. यावेळी येथील बिअर शॉपी चालक पोलिसांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांना तुम्हाला बघतोच, असे म्हणत सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. शिवाय या बिअर शॉपी चालकाने अवैधरीत्या देशी-विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.