घराघरांतील बाल योद्ध्यांचे वागणे कौतुकास्पद 

The behavior of child warriors in the household is admirable
The behavior of child warriors in the household is admirable

कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : एरव्ही एक दिवस देखील घरी किंवा एका ठिकाणी कोणताही हट्ट न करता शांत न बसणारी बहुतांश छोटी मुले गेल्या 41 दिवसांपासून कोणताही हट्ट न करता घरात शांत बसले आहेत. या काळातील मुलांच्या संयमाचे, समंजसपणाचे, मोठ्यांचे अनुकरण करण्याचे आणि जबाबदारीचे वागणे खरोखरच कौतुकास्पद आहे. घरातच राहून सूचनांचे पालन करत संयम दाखवणारे हे पण योद्धेच आहेत असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून संचारबंदी सुरु आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. हॉटेल्स, बहुतांश खाऊंची दुकाने, खेळण्यांची दुकाने, पुस्तकांची दुकाने आदी बंद आहेत. मैदानावर खेळता येत नाही. बाहेर सामुहिक खेळ खेळता येत नाहीत. शाळा बंद असल्याने मित्रांबरोबर भेट नाही, मनसोक्त गप्पा मारता येत नाहीत. घराच्या बाहेर पडता येत नाही. तरीपण ही मुले समंजसपणे वागत कोणत्याही गोष्टीची तक्रार करताना दिसत नाहीत. बाहेर जायचा हट्ट करत नाहीत. आई वडील, आजी, आजोबा बहिण, भाऊ यांच्या सोबतच घरात राहुन घरातीलच उपलब्ध खेळ खेळत आहेत. टीव्ही पाहणे, घरातील सर्वांबरोबर गप्पा मारतात. बाहेरील खाऊचा, बाहेर खेळण्याचा हट्ट करत नाहीत. पालकही मुलांना पुरेसा वेळ देत आहेत. सुट्ट्यांमध्ये अनेक मुलांनी मामाच्या, मावशीच्या काकाच्या गावी जाण्याचे नियोजन संचारबंदी सुरु होण्यापुर्वी केले होते. परंतु, मुलांना परगावी देखील जाता आले नाही. 'मॅच्युरिटी इज स्टेज ऑफ लाईफ बट नॉट डिपेंड ऑन एज' या इंग्रजी वाक्‍याप्रमाणे वयाने जास्त असलेल्या काही व्यक्ती विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. परंतु बहुतांश मुले या काळात समंजसपणे वागत विनातक्रार घरातच थांबली आहेत. 

घरी राहण्याची सुचना आपल्यासाठीच 
मी कितीतरी दिवसांपासून घराच्या बाहेर गेलो नाही. घराच्या बाहेर जाऊ नये, ही सुचना आपल्या चांगल्यासाठी आहे. 
- मंदार महामुनी, कुर्डुवाडी 

मी घरातच खेळते 
मी आजी, मम्मी, पप्पा यांच्या बरोबर घरातच खेळते. बाहेर, बागेत जात नाही. बाहेर विनाकारण फिरणे चुकीचे आहे. 
- शार्वी पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com