esakal | विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालकेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी । Sugar
sakal

बोलून बातमी शोधा

भगिरथ भालकेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

भगिरथ भालकेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

sakal_logo
By
- भारत नागणे

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके आणि त्यांच्या संचालक मंडळावर पहिल्यांदाच डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर विठ्ठल परिवारात मोठी खळबळ उडाली आहे.

कारखान्याच्या 45 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथम अध्यक्षासह संचालक मंडळावर आरोप झाल्याने सभासदांमध्येही या विषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान पाटील यांनी केलेल्या आरोपी विषयी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विठ्ठल परिवारातील कार्यकर्ते व कारखान्याच्या सभासदांमधून केली जात आहे.

विठ्ठल कारखान्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे, मागील वर्षी गाळप झालेल्या उसाच्या एफआरपीसह कामगार आणि वाहतूक दारांची देणी थकीत आहेत. अशातच गाळप हंगाम सुरु होणार की नाही याविषयी संभ्रम असतानाच डीव्हीपी उद्योग समुहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या संचालक मंडळावर साखर उतारा कमी दाखवून साखर घोडाळा केल्याचा जाहीर आरोप केला आहे.

कारखान्याच्या इतिहासात प्रथमच गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने सभासद शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. या संदर्भात कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके किंवा त्यांचे संचालक याविषयी भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा होती. परंतु आरोप केल्यानंतरही भालके किंवा त्यांच्या समर्थक एकाही संचालकाने पाटील यांच्या आरोपाचे खंडन केले नाही. त्यामुळे कारखान्याच्या सभसादांमध्ये आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी देण्यावरुन संचालक मंडळात उघड दोन गट आहेत. गटबाजीमुळे कारखान्याचे व्यवस्थापन ठप्प झाले आहे. यावर्षीचा गाळप हंगाम सुरु होणार की नाही विषयी सभासद व कामगारांमध्ये संभ्रम असतानाच अभिजीत

पाटील यांनी कारखान्यातील गैर कारभाराची चौकशी करुन गु्न्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पाटील यांच्या आरोपानंतर तालुक्यात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संदर्भात भगिरथ भालके आपली भूमिका कधी स्पष्ट कऱणार याकडे कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top