20 वर्षांपासून ती नवऱ्यासोबत करतेय रंगकामासह वेल्डिंग

Bhagyashree More
Bhagyashree Moreesakal
Summary

भाग्यश्री या ही सर्व कामे सहज करून व्यवसायात मदत करतात. स्वतःचे संसार उभे करण्यासाठी न लाजता पडेल ते काम ते स्वतः करतात.

अक्कलकोट (सोलापूर): शिरवळ ता.अक्कलकोट येथील भाग्यश्री मोरे यांचा विवाह यशवंत यांच्याबरोबर वीस वर्षांपूर्वी झाला आहे. तेव्हापासून आजपर्यंत पतीची साथ देत त्यांच्या शेती अवजारे बनविण्याच्या व्यवसायात निरंतर मदत करीत आहेत. सुरुवातीस फक्त पन्नास रुपये भांडवलावर यशवंत यांनी फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू केला. त्यानंतर सहा महिन्यांत पत्नी भाग्यश्री या त्यांच्या व्यवसायात मदत करू लागल्या. हळूहळू निरीक्षणातून एकेक काम शिकून घेतले आणि प्रत्येक कामात मदत करू लागल्या.

Bhagyashree More
अक्कलकोट शहर व ग्रामीण भागात जोरदार पाऊस

यशवंत यांना भिवंडी व पुणे येथील अशा कामाचा अनुभव होताच त्याचा उपयोग करून स्वतः आणखी शिकत पत्नीला प्रत्येक बारकावे कामातील शिकवून त्यांना प्रशिक्षित केले. त्यांनतर पती नसतानाही भाग्यश्री या स्वतः सर्व कामे करीत नेटाने आपला व्यवसाय सांभाळला व वाढविला देखील. त्यांनतर यशवंत यांनी व्यवसाय बदल करीत शेती अवजारे बनविणे, ट्रॅक्टर ट्रेलर बनविणे, पाण्याचे टँकर बनविणे, मळणी मशीन बनविणे सुरू केले आणि त्याचे कटिंग, वेल्डिंग, होल मारणे तसेच पेंटिंग करणे आदी सर्व कामे भाग्यश्री या करू लागल्या आहेत. ऊस भरायच्या अकरा फूट उंचीच्या वाहनांची शिडी लावून स्वतः आकर्षक रंगसंगती वापरत उंचावर उभे राहून न थकता व कंटाळत रंगकाम करीत असतात. इथे येणारे प्रत्येक ग्राहक व नागरिक भाग्यश्री यांच्या कामाचे सतत कौतुक करीत असतात.

Bhagyashree More
अखेर अक्कलकोट शहरातील सीसीटीव्ही सुरू! गुन्हेगारीवर येणार नियंत्रण

खर तर हे जड काम पुरुषाला देखील करणे कधी कधी अवघड जाते, पण भाग्यश्री या ही सर्व कामे सहज करून व्यवसायात मदत करतात. स्वतःचे संसार उभे करण्यासाठी न लाजता पडेल ते काम ते स्वतः करतात. त्यांच्या पतींनाही हे काम मोठे अप्रूप वाटून आपल्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करणारी पत्नी मिळाली याचा अभिमान सुद्धा वाटतो. अशा प्रकारे अनुभव हेच शिक्षण बनून त्यांच्या व्यवसायची वाढ दिवसेंदिवस जास्तच होत आहे. आता या व्यवसायात ओम, उदय व सुधीर ही मुले शिक्षण घेत लहानपणापासून वडील यशवंत व आई भाग्यश्री यांना मदत करीत खारीचा वाटा उचलत आहेत.

Bhagyashree More
टोलचा झोल सुरू! सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर दोन टोल नाके

माझी पत्नी ही नेहमी सहकार्य वृत्तीने वागत असते. तिने रंगकामसह सर्व कामे सहज करते. मी असो अथवा नसो पण सर्व व्यवसाय चांगले सभाळते. माझ्या लग्नाच्या वाढदिवशी स्वतः काम करून साठविलेले पन्नास हजार रुपये खर्च करून मला मोटारसायकल भेट दिली आहे. असा नशीबवान पती मी असणे यातच सर्व काही आले आहे या गोष्टी मनाला आनंद देणारे आहेत.

- यशवंत मोरे, व्यासायिक शिरवळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com