वारकरी संप्रदायातील तालसम्राट भानुदास महाराज ढवळीकर यांचे वैकुंठगमन | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारकरी संप्रदायातील तालसम्राट भानुदास महाराज ढवळीकर यांचे वैकुंठगमन
वारकरी संप्रदायातील तालसम्राट भानुदास महाराज ढवळीकर यांचे वैकुंठगमन

वारकरी संप्रदायातील तालसम्राट भानुदास महाराज ढवळीकर यांचे वैकुंठगमन

पंढरपूर (सोलापूर) : वारकरी संप्रदायातील तालसम्राट तथा श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाचे माजी अध्यक्ष ह.भ.प. भानुदास महाराज ढवळीकर (Bhanudas Maharaj Dhavalikar) (अण्णा) (वय 88) यांचे काल (बुधवारी) रात्री पंढरपूर (Pandharpur) येथे देहावसान झाले. त्यांच्या पार्थिवावर वारकरी संप्रदाय नियमानुसार चंद्रभागातीरी अंत्यसंस्कार होणार आहेत. (Bhanudas Maharaj Dhavalikar, Talsamrat of Warkari sect passes away)

हेही वाचा: सोलापूर 'सिव्हिल'मधील डॉक्‍टर्स व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

त्यांचे शालेय शिक्षण अकरावी, प्राथमिक मृदंग शिक्षण वडील जनार्दन महाराज ढवळीकर (Janardan Maharaj Dhavalikar) यांच्याकडे तर शास्त्रीय तबला व मृदंग शिक्षण पंढरपूर येथेच वै. गोडबोले गुरुजी (Godbole Guruji) यांच्याकडे झाले होते. वारकरी संप्रदायातील 'तालसम्राट' (Talsamrat) हा पुरस्कार तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्या हस्ते महाराजांना प्रदान करण्यात आला होता. तसेच देहूकर फडाच्या वतीने दिला जाणारा सांप्रदायिक मृदंग सेवा पुरस्कार, समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीने मृदंगाचार्य पुरस्कार, मृदंगमहामेरू पुरस्कार, जय मृदंग पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दिंडीमध्ये तसेच तळावरील पालखी समोरील मानाच्या कीर्तनसेवेत सलग 25 वर्षे मृदंग वादनाची सेवा करण्याचा एक अनोखा विक्रमच त्यांनी प्रस्थापित केला होता.

महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र (Andhra Pradesh), तेलंगणा (Telangana) या भागात आपल्या मृदंगाच्या निनादाने संप्रदाय सेवा करतानाच हजारो विद्यार्थी जे आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे मृदंग वादक म्हणून प्रसिद्ध आहेत ते महाराजांनी घडवण्याचे महान कार्य केले. संप्रदायातील ज्येष्ठ फडकरी वै. विवेकानंद महाराज वासकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून काम करताना त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविरोधी वारकरी संप्रदायाची भूमिका पालखी सोहळा दिंडी समाजाचे अध्यक्ष या नात्याने जोरकसपणे मांडली.

वृद्धापकाळातही शेवटपर्यंत त्यांनी संप्रदायाची सेवा हाच ध्यास बाळगला. काल (बुधवारी) शुद्ध दशमीच्या सायंकाळी अल्पशः आजाराने त्यांची प्राणज्योत ढवळीकर महाराज फड, प्रदक्षणा रोड या पंढरपूर येथील निवासस्थानीच मालवली. संप्रदायात त्यांचे निधनाने शोककळा पसरली असून, त्यांचा अंत्यविधी पंढरपूर येथेच वारकरी संप्रदाय नियमानुसार चंद्रभागा तीरी होणार आहे. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू मृदंगविशारद ह.भ.प. देविदास महाराज ढवळीकर, रामदास महाराज असा परिवार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top