
Bharat jodo yatra : ट्रॅक बॉन्डिंगचा मनी ध्यास ‘महाराष्ट्राच्या नेतृत्वा’चा
काँग्रेस पक्षाचे बॉन्डिंग होण्यासाठी या पक्षाचे युवा नेतृत्व राहूल गांधी यांचे ‘भारत जोडो’ हे अभियान देशभर चालू आहे. या अभियानात आमदार प्रणिती शिंदे यांनी हिरिरीने आपला सहभाग नोंदवला.
‘भारत जोडोे’ अभियानाच्या बॉन्डिंग ट्रॅकवर सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्यसमोर मोठं शक्तीप्रदर्शन करीत प्रणिती शिंदे यांनी ‘हम साथ साथ है’ चा जणू नारा दिला. या अभियानात त्या राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय राहिल्या.प्रणिती शिंदे यांचा या दरम्यान हा ट्रॅक राहुल गांधी यांच्याशी राजकीय दृष्ट्य बॉन्डिंग करण्याचा अन् महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याच्या पार्श्वभूमीवर,भविष्यातील वाटचाल सुकर करण्याचाच असावा.
आमदारकीची हॅट्रीक साधणार्या युवा आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षातील आता सिनीअर नेत्या आहेत. प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष असलेल्या प्रणिती शिंदे यांना आपल्या नेतृत्वाने आख्या महाराष्ट्राचे क्षितीज व्यापायचे असावे.
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याच्यादृष्टीने वाट चोखाळताना युवा नेतृत्व राहूल गांधी यांचे समर्थन पाठिशी राहण्याच्या अनुषंगानेच, प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो या यात्रेदरम्यानच्या ट्रॅकवरच राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय राहून त्यांच्याशी आपले बॉन्डिंग जणू पक्के करण्याचा त्यांचा प्रयत्न झाला.
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याच्या ध्यासाची त्यांची पाऊले तर या या़त्रेदरम्यान तशी दमदार पडली. कारण अत्यंत चाणाक्ष आणि धोरणी असलेल्या प्रणितींनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने राहुल गांधी यांच्यासमोर प्रभाव पडेल अशा पध्दतीने या यात्रेत शक्तीप्रदर्शन केले. यात्रेच्या अमरावती जिल्ह्याच्या जबाबदारमधून आपल्या नेतृत्वाचे वेगळेपण दाखवून दिले.
दरम्यान आपले राजकीय भवितव्य ‘उज्वल’ होण्यासाठी अन् राहण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी साखर पेरणी अत्यंत झक्कास केली. तथापि, ‘हात से हात जोडो’ या काँग्रेसच्याच नव्या स्लोगनप्रमाणे प्रणिती शिंदे यांनी सध्या तरी महाराष्ट्राचे आणि पुढे होऊन देशाचे नेतृत्व करण्यासाठी राहूल गांधी किती ‘हात’ देतात? हे येत्या काळात निश्चितपणाने दिसेल.
मजल दरमजल करीत सोलापुरचे सुपुत्र असलेल्या सोलापूर शिंदे यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाने दिल्लीच्या तख्यावर अटकेपार झेंडा रोवला. या त्यांच्या अत्यंत यशस्वी राजकीय प्रवासाच्या ट्रॅकवर ‘दलित चेहरा’ ही जरी जमेची गोष्ट होती, तरी पण त्यांच्या पाठिशी हायकमांड सोनिया गांधी यांचा ‘हात’ होता. तद्वतच प्रणिती शिंदे यांच्या पाठिशी गांधी परिवाराचा खास करुन राहुल गांधी यांचा ‘हात’ राहिल्यास महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचा त्यांचा ट्रॅक अधिक भक्कम आणि सह्याद्रिच्या तख्तावर अटकेपार झेंडा रोवण्याला अनकुल होणार ठरेल हे निश्चित.
ताई भारत जोडे यात्रेत
वेगळ्या हालचाली मात्र राजधानी अन् उपराजधानीत
आमदार प्रणिती शिंदे या भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत, त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड,अकोला,अमरावती, वासीम तसेच राजस्थानमधील अनेक भागातील यात्रेत सहभाग नोंदविला. अमरावतीच्या यात्रेची तर जबाबदारी स्वत:हून घेतली.याशिवाय त्या पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील यात्रेत सहभागी होणार आहेत.
एकीकडे भारत जोडो यात्रेतील सहभागाचा त्यांचा झंझावात सुरु असतानाच दुसरीकडे त्यांना भाजप घेण्याच्या प्राथमिक चर्चा अन् हालचाली राजधानी मुंबई अन् उपराजधानी नागपूर येथे सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
काही ठळक नोंदी
- दिल्लीच्या राजकारणाची प्रणितींना सध्या तरी नाही पडत नसावी भूरळ
- गांधी परिवार पर्यायाने गॉडफादर राहुल गांधी यांच्याकडेच थेट बॉन्डिंगचा प्रणितींचा इरादा
- पित्याप्रमाणे राष्ट्रीय नेतृत्वाचा ‘हात’ पाठिशी घेण्यासाठी प्रणितींची कासावीस
- राज्याच्या नेतृत्वात ‘स्वारस्य’ असल्यानेच विधानसभेच्या शहर मध्य सोलापूर मतदार संघावर पक्कड घट्ट ठेवण्याचे प्रयत्न
- सोलापूर लोकसभा लढण्याचा प्रणितींचा सध्या तरी दिसत नाही मनसुबा
- महाराष्ट्राचे किंवा देशाचे नेतृत्व असो, गांधी परिवाराचा हात डोक्यावर असल्यास मार्ग सुकर असतो हे ओळखुनच प्रणितींची पाऊले