'भिमा कारखाना करणार 10 लाख मेट्रीक टन ऊस गाळप व 6 कोटी युनिट विजनिर्मीती' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhima Sugar Factory

सन 2022/23 च्या गळीत हंगामात भीमा सहकारी साखर कारखान्याने दहा लाख मेट्रीक टन उसाचे गाळप व सहा कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले.

'भिमा कारखाना करणार 10 लाख मेट्रीक टन ऊस गाळप व 6 कोटी युनिट विजनिर्मीती'

मोहोळ - चालू सन 2022/23 च्या गळीत हंगामात भीमा सहकारी साखर कारखान्याने दहा लाख मेट्रीक टन उसाचे गाळप व सहा कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून, ऊस उत्पादक, शेतकरी व कामगारांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रतिपादन पांडुरंग ताटे यांनी कारखाना प्रशासनाच्या वतीने केले.

टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 43 व्या गळीत हंगामातील "मिल रोलर चे पूजन" मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ताटे बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, शेती अधिकारी माणिक पाटील, संचालक राजेंद्र टेकळे, बिबीषन वाघ, दिलीप रणदिवे, गणपत पुदे, अनिल गवळी, सिद्राम मदने, बाळासाहेब चव्हाण, दादासाहेब शिंदे, बापू जाधव, यांच्यासह भारत पाटील, राजू बाबर, सुनील चव्हाण, संग्राम चव्हाण, चीफ अकाउंटंट नामदेव इंगळे, इंजिनियर आसबे, लेबर ऑफिसर भारत पाटील आदीसह शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप म्हणाले, चालु गळीत हंगामात कारखाना एक ऑक्टोबर पासून सुरू होणार असून, कारखाना प्रशासनाने तशी जय्यत तयारी केली आहे. कामगारांनीही कारखान्यातील यंत्रसामुग्रीची कामे पूर्ण केली आहेत. ऊस वाहतुकीसाठी कारखान्याने 400 बैलगाड्या, 450 डम्पिंग गाड्या, 225 ट्रॅक्टर यांच्याशी करार केला असून, ऊस तोडणी यंत्रणा व वाहन मालकांना सहा कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. पाच ऊस तोडणी यंत्र ही सज्ज ठेवली आहेत.

गेल्या वर्षी जाहीर केल्याप्रमाणे ऊस तोडणी कार्यक्रमा प्रमाणे को 86032 हा वाण कारखान्याकडे गाळपास आल्यावर त्याला प्रतीटन शंभर रुपये ज्यादा दर देण्यात येणार असल्याचेही उपाध्यक्ष जगताप यांनी सांगितले. कारखाना लवकरच इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प हाती घेणार असुन, त्याची प्राथमिक अवस्थेतील प्रक्रीया सुरु झाल्याचे जगताप यांनी सांगितले. कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी सर्व कामगार, सभासद यांनी कारखान्याचे अध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे अवाहन उपाध्यक्ष जगताप यांनी केले.

सोहाळे ता मोहोळ येथील ग्रामपंचायतीवर सतत वीस वर्ष भीमा परिवाराची सत्ता अबाधीत ठेवल्या राखल्या बद्दल सोहाळ्याचे सुपुत्र तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांचा कारखाना व कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Bhima Cooperative Sugar Factory Sugarcane Crushing And Electricity Generation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..